You are currently viewing सावंतवाडी शहरातील सभासद नोंदणी कार्यक्रमाचा ना. नितेश राणेंकडून आढावा 

सावंतवाडी शहरातील सभासद नोंदणी कार्यक्रमाचा ना. नितेश राणेंकडून आढावा 

भाजपा पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद

सावंतवाडी :

भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महाअभियान २०२५ अंतर्गत सावंतवाडी शहरातील अभियानासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी आढावा घेतला. सावंतवाडी शहर भाजप कार्यालयात ही बैठक संपन्न झाली.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्षा मोहीनी मडगांवकर, माजी नगरसेवक ॲड.परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, दीपाली भालेकर, प्रवक्ते ॲड. संजू शिरोडकर, मेघना साळगांवकर, सालईवाडा बुथ अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटकर, संतोष गांवस, नितीन सातपुते, प्रभाग अध्यक्ष कुणाल श्रुंगारे, अमित गवंडळकर, मेघना भोगटे, अन्वीशा मेस्त्री, सावंतवाडी शक्ती केंद्र प्रमुख साईनाथ जामदार, मिसबा शेख, भावना नार्वेकर, ज्योती मुद्राळे, शाम रेमुळकर, मंदार पिळणकर आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा