You are currently viewing देवगडच्या पाणी समस्येवर ठोस उपाय योजना काढण्यासाठी मंत्री नितेश राणे घेणार बैठक

देवगडच्या पाणी समस्येवर ठोस उपाय योजना काढण्यासाठी मंत्री नितेश राणे घेणार बैठक

देवगडच्या पाणी समस्येवर ठोस उपाय योजना काढण्यासाठी मंत्री नितेश राणे घेणार बैठक

देवगड

देवगड जामसंडे नगरपंचायत अंतर्गत सध्या अनियमित व बंद असलेल्या नळपाणीपुरवठा योजनेबाबत नामदार नितेश राणे साहेब, मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य, यांनी उद्या, सोमवार, ६ जानेवारी रोजी अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे.

देवगडच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नामदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला असून यासाठी पहिली बैठक सकाळी ९.०० वाजता शासकीय विश्रामगृह, कणकवली येथे संबंधित अधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात येणार आहे.

नामदार नितेश राणे मंत्री झाल्यामुळे देवगडवासीयांना पाणी प्रश्नातून दिलासा मिळणार आहे. हा प्रश्न काही दिवसांत निकाली निघेल, असा विश्वास देवगडवासीयांना वाटतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा