*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आठवणींचा हिंदोळा*
साठवीत राहते ती
डोळे घट्ट मिटून
आठवणींचा हिंदोळा
आठवणींच्या आधाराने
जीवन जगण्यासाठी
वयाच्या एका पडावात…
नेत्रांच्या कुपीतून
एका एका क्षणाची
आठवण काढत
नेत्र सुखाच्या साह्याने
मन रिझवायला
कामी यावे म्हणून…..
ती घेते डोळे घट्ट मिटून
कधीकधी क्षणाक्षणात
साठवीत राहते
तिच्या आयुष्याच्या
सुखदुःखांच्या मोरपीसांना
मनाच्या हिंदोळ्यावर
झुलवायला….
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे
.*
7588318543.
8208667477.