You are currently viewing १३ जानेवारी पासून वडाचापाट स्वयंभू श्री देवी शांतादुर्गा देवीचा वार्षिक जत्रौत्सव

१३ जानेवारी पासून वडाचापाट स्वयंभू श्री देवी शांतादुर्गा देवीचा वार्षिक जत्रौत्सव

मालवण :

वडाचापाट येथील नवसाला पावणाऱ्या स्वयंभू श्री देवी शांतादुर्गा देवीचा वार्षिक जत्रौत्सव १३ जानेवारी ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. स्वंयभू श्री शांतादुर्गा माऊलीच्या नामाचा जयघोष करीत आई माऊलीचे भरजरी वस्त्रालंकार घालून नटलेले भव्य दिव्य, प्रसन्न अश्या रुपाचे दर्शन हजारो भाविकानी घ्यावे. आईच्या चरणी नतमस्तक व्हावे. स्वयंभू श्री देवी शांतादुर्गा जत्रौत्सवानिमित्त वडाचापाट ग्रामस्थ आयोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

१३ जानेवारी २०२५ रोज सकाळी ८.०० वा. ते दु. १२.३० वा. कलशारोहण वर्धापन दिन आणि महाप्रसाद, सकाळी१०.०० वा. मोफत औषधांसह सर्व साधारण आरोग्य शिबीर महाराष्ट्र शासन, रात्री ११.०० पूजापाठ व पालखी सोहळा, आईचा गोंधळ (लोकजागर)

१४ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वा. कृषी प्रदर्शन महाराष्ट्र शासन, सकाळी १०.३० वा. शालेय विद्यार्थींचा गुणगौरव सोहळा, दुपारी ३.०० स्नेह मेळावा, (हळदीकुंकू समारंभ / विविध स्पर्धा), रात्री. ९.३० वा. डान्स स्पर्धा

१५ जानेवारी सकाळी ८.०० वा. श्री दुर्गासप्तशती महायज्ञ व महाप्रसाद, सकाळी १०.०० वा. मोफत औषधांसह सर्व साधारण आरोग्य शिबीर महाराष्ट्र शासन, रात्री ११.०० पूजापाठ व पालखी सोहळा, तद्नंतर प्रोप्रा. चेंदवणकर-गोरे दशावतारी मंडळनिर्मित दहिकाला

१६ जानेवारी दुपारी २.०० गरबा नृत्य (दांडिया रास) स्थानिक, दुपारी ४.०० संगीत भजन स्पर्धा २०२५

१७ जानेवारी सकाळी १०.०० वा. कोकुयो कॅम्लिन पुरस्कृत: शैक्षणिक उपक्रम/स्पर्धा, सायं ७.०० वा. भव्य दीपोत्सव, रात्री ९.०० वा. बक्षिस वितरण समारंभ, रात्री ११.०० पूजापाठ व पालखी सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत.

सर्व भाविकांनी वार्षिक जत्रौत्सवात उपस्थिती राहून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन वडाचापाट गाव थळकरवाडी परिवार कडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा