आंब्रड भगवती देवीचा ७ जानेवारीला गोंधळ उत्सव
कणकवली :
आंब्रड भगवती देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव ७ जानेवारी मंगळवार रोजी विविध धार्मिक कार्यक्रमासह मोठ्या ऐश्वर्यात संपन्न होणार आहे, नवसाला पावणाऱ्या या भवानीच्या गोंधळ उत्सवाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानं च्या वतीने केलें आहे. तळ कोकणातील काही प्रसिद्ध असलेल्या देवस्थानं पैकी श्री भगवती देवी देवस्थान आंब्रड हे ऐक धार्मिक पवित्र देवस्थानं असून प्रती वर्षी पौष महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी आई भगवती देवीचा गोंधळ उत्सव मोठ्या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमासह संपन्न केला जातो.
अशा या तिर्तक्षेत्र असलेल्या, नवसाला पावणाऱ्या आई भवानी, भगवती मातेच्या गोंधळ उत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतात आपण ही सर्व भाविकांनी ७ जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या या गोंधळ उत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.