*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री सरिता परसोडकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यतिथीनिमित्त लिहिलेले दोन शब्द…
शीर्षक !!ग्वाही!!
चढूनी दुःखाचा डोंगर
दिली सुखाची सावली
हात दिला गरजूंना
सदैव पावलो पावली..
गेली आधार सोडून
झाले पुन्हा निराधार
अनाथांची होती माय
कुठे फिरेल गं दारोदार…
नाळ जोडली जन्मताच
होती तिची गं दुःखाशी
तरी ठेवी दुसऱ्यासमोर
सदैव सुखाच्या त्या राशी.
संरक्षण दिले त्या गाईने
लेक जन्मली गोठ्यात
ठेचली नाळ दगडाने
फिरली घेऊन पदरात.
तुझ्यासारखी सिंधू माई
या जगात होने नाही
हे चंद्र सूर्य ही देतील
माते तुला निरंतर ग्वाही…
किती राष्ट्राने गौरविले तुला
पद्मश्री पुरस्काराने जरी
चंद्र तो कुंकवाचा कपाळी
शोभून दिसली गळसरी..
मरावे परी कीर्तिरूपे उरावे
शिकवण दिली तु जगाला
कधी होईल का फायदा
त्याचा अंधमय या माणसाला..
स्वार्थापायी इथे शेकतो
जो तो आपली पोळी
सरणावरती चढे पर्यंत
खातो अहंकाराची गोळी..
सौ सरिता परसोडकर पुसद✒️