मालवण :
मालवणची सुकन्या सानिका कांचन सुदेश आचरेकर यांनी अर्लिंग्टन येथील टेक्सास विद्यापीठातून इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली आहे. सानिका या कॅलिफोर्नियामध्ये कार्यरत असून डेटा सायन्स, एआय मध्ये स्वारस्य असून त्या या क्षेत्रात करियर करणार असल्याचे सानिका यांनी सांगितले आहे. एआय हा जागतिक बदल आहे. एआय अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्सला मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. आर्टिफिशल इंटेलिजन्स हा कॉम्प्युटर सायन्सचा एक भाग आहे. संगणक प्रणाली माणसाच्या बुद्धीप्रमाणे काम करते. याच तंत्रज्ञानाद्वारे अनेक गोष्टी माणसापेक्षाही अधिक सहज करते. या क्षेत्रात सानिका आपले भविष्य पाहत असून त्या निश्चितच यशस्वी होतील अश्या शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व माजी नगरसेविका कांचन (स्नेहा) आचरेकर यांची सुकन्या असलेल्या सानिका यांचे शालेय शिक्षण मालवण रोझरी इंग्लिश स्कूल येथे झाले. तर ११ वी १२ वी पर्यंतचे डीजी रुपारेल कॉलेज ऑफ सायन्स व कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे झाले. डेटा सायन्स, एआय मधेच स्वारस्य आहे. म्हणून माहिती प्रणाली डेटा, एआय, व्यवस्थापनासाठी डेटा, एआय मॅनेजमेंटसाठी डेटा निवडतात. त्यानुसार लक्ष केंद्रित करून सानिका यांनी इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली.
एआय बऱ्याच मॅन्युअल गोष्टी घेत आहे, प्रत्येक गोष्ट डेटा आहे, आपण जे काही बोलता ते आपल्या फोनद्वारे संग्रहित केले जाते. त्याला डेटा म्हणतात. या डेटाला साफसफाईची आणि व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. वाचण्यास सोपे तसेच वापरकर्ता साठी अनुकूल असे अहवाल प्रदान करणे हे माझे काम आहे. हे क्षेत्र भविष्य आहे . जग जसजसे वाढत जाईल तसतसे तंत्रज्ञान अधिक वेगाने वाढेल. असे सानिका यांनी यां निमित्ताने सांगितले.
वडील हे माझे ढाल आहेत, त्यांनी प्रत्येक पावलावर नेहमीच खंबीरता आणि साथ दिली. सोबतच हा प्रवास आई शिवाय शक्यच नसता. कारण आईंची दृष्टी असणे अत्यावश्यक आहे. माझ्या आईंची दूरदृष्टी, त्याग, समर्पण आणि अखंड मार्गदर्शन यामुळे मला या प्रवासात मदत झाली. भाऊ ओमने मला संयम आणि प्रत्येक परिस्थितीत शांत कसे राहायचे हे शिकवले. शाळेने मला खूप काही शिकवले आहे आणि मला एक चांगली व्यक्ती बनवले. माझे सर्व शिक्षक यांचे मिळालेले मार्गदर्शन माझ्यासाठी महत्वाचे ठरले आहे. हे केवळ माझेच यश नाही तर प्रत्येक मालवणकरांचे यश आहे. “कष्ट करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका” असेही सानिका यांनी या निमित्ताने सांगितले.