दोडामार्ग हत्ती नुकसान प्रश्नी राजू मसुरकर आक्रमक
जनहित याचिका दाखल करणार; माहिती अधिकारात उप वनसंरक्षक यांना निवेदन सादर
सावंतवाडी :
दोडामार्ग तालुक्यामध्ये गेले पाच वर्षाहून अधिक हत्तींमुळे बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. बागायतदारांना बागेत फिरताना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे. यासाठी गेल्या पाच वर्षांमध्ये बागायतरांचे दोडामार्ग तालुक्यामध्ये किती नुकसान झाले याची माहिती व हत्तीची किती संख्या आहे याची माहिती मिळावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी उप वनसंरक्षक श्री. रेड्डी यांच्याकडे केली आहे. माहितीचे अधिकारामध्ये त्यांनी ही माहिती मागितली आहे. तसेही उच्च न्यायालयामध्ये याबाबत जनहित याचिका दाखल करणार असल्याचे श्री. मसुरकर यांनी यावेळी सांगितले.
दोडामार्ग तालुक्यामध्या फळबागायतदारांच्या बागतीत हत्तींचा कळप जाऊन अतोनात नुकसान करत आहेत. त्याचप्रमाणे बागेमध्य मानवी व्यक्ती फळझाडांचा उत्पन्न घेताना त्यांना आपला जीव मुठीत घाऊन फिरावा लागत आहे. हत्तींच्या कळपामुळं भीतीच वातावरण नागरिकांमध्ये आहे. अशावेळी हत्तीचा कळप पकडून वनखात्याच्या फॉरेस्ट राखीव जंगलांमध्ये किंवा प्राणी संग्रालयमध्ये कळप पकडून सोडण्यासाठी अशा प्रकारची उपाययोजना वनखात्यात मार्फत झाली आहे का ? याची माहीती मिळावी. तसेच मागील पाच वर्षांमध्ये फळबागातदारांचा किती नुकसान झाल ? याची माहिती मिळावी अशी मागणी राजू मसुरकर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, मनुष्य वस्तीमध्ये हत्ती फिरत असल्याने त्यापासून दोडामार्ग तालुक्यामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्य किती व्यक्ती मनुष्य मृत्युमुखी पडले याची सुद्धा माहिती देण्यात यावी अशी मागणी माहितीच्या अधिकारात राजू मसुरकर यांनी उप वनसंरक्षक यांच्याकडे केली.
दरम्यान, मुख्यमंत्री, वनमंत्री, मुख्य वनसंरक्षण मंत्रालय, वनरक्षक अधिकारी सिंधुदुर्ग, जिल्हाधिकारी यांनी मानवी संरक्षण करण्यासाठी जबाबदारी पार पडली नसल्याने व त्यामुळे मनुष्यव्यक्ती मृत्युमुखी पडल्यास त्यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये दाद मागावी लागेल असही श्री. मसुरकर यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी सुनील कोरगावकर उपस्थित होते.