You are currently viewing कृतज्ञता सरत्या वर्षाप्रती

कृतज्ञता सरत्या वर्षाप्रती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी प्रा.सत्यवान घाडी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कृतज्ञता सरत्या वर्षाप्रती*

*********************

 

नाही विसरणार सरत्या वर्षा

साथ तुझी संपली तरी

तुझ्या कुशीतले दिवस सारे

गेले मज मोर पंखापरी।।१।।

 

भरभर संपले बाराही महिने

कळले नाही कधी कुणाला

आनंदाच्या भरात असता

दु:खही खुजे वाटले मनाला।।२।।

 

प्रारंभी तुझे स्वागत करता

कैक संकल्प करून गेलो

पूर्णत्त्वाला ते नेता नेता

खूप काही शिकून गेलो।।३।।

 

तुझ्या संगती चालता चालता

शोधली वाट नवतेजाची

बघता बघता गाठभेट झाली

तुझ्या कृपेने नववर्षाची।।४।।

 

जाता जाता तुला निरोप देईल

झगमगणारे हे विश्व सारे

नववर्षाच्या स्वागतासाठी

वाहतील चोहीकडे बेधुंद वारे।।५।।

 

***********************

*रचना:-* प्रा. सत्यवान शांताराम घाडी.

*गाव:-* किंजवडे , घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.

*ठाणे:-* दिवा

🌺*सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!*

प्रतिक्रिया व्यक्त करा