बांदा :
52 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी, तालुका कणकवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या प्रदर्शनात नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुलीची विद्यार्थीनी कुमारी गौरांगी गणेश राणे हिने माध्यमिक विभाग निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळवत शाळेचे नाव उंचावले आहे.
गौरांगीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्या विकास मंडळ इन्सुलीचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सल्लागार, शिक्षक-पालक संघाचे पदाधिकारी व सदस्य तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकवर्गाकडून तिचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक करण्यात आले आहे.
या यशामुळे नूतन माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आणि सर्जनशीलतेचा ठसा पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला नवी ऊर्जा मिळाली आहे.