You are currently viewing आनंदाची फुलवात

आनंदाची फुलवात

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आनंदाची फुलवात*

(अष्टाक्षरी)

 

नव्या वर्षाचा आरंभ

चैतन्याची लावा वात

रम्य सोनेरी पहाट

टाकू निराशेची कात….१

 

नवा जोश नवी उर्मी

उत्साहात सुरूवात

मनोमनी उजळुया

आनंदाची फुलवात….२

 

नित्य तनाचा व्यायाम

जपू आरोग्याचा मंत्र

आचरावे नियमाने

प्राणायाम योग तंत्र … ३

 

निसर्गाची धूप ऱ्हास

सान थोर हात धरा

झाडे लावू मुबलक

वाचवाया वसुंधरा….४

 

व्हावी देशाची उन्नती

सारे करूया संकल्प

नांदो सुख समाधान

नाना राबवू प्रकल्प ….५

 

कर्म सदा साथ देई

ठेवू मनी ठाम जिद्द

जोड अथक कष्टांची

संयमाने होई सिध्द…..६

 

स्वप्ने सुंदर उद्याची

वाटे ध्येयपूर्ती सार्थ

प्रयत्नांची पराकाष्ठा

करू जीवन कृतार्थ…..७

 

©️®️ डॉ.सौ.मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा