कुडाळ :
श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी हुमरमळा ता. कुडाळ व श्री पुष्पसेन सावंत फार्मसी ॲल्युमिनियम असोसिएशन तर्फे कै. पुष्पसेन सावंत यांच्या प्रेरणेतून, प्राचार्य.डॉ. पांढरे सर, यांच्या प्रोत्साहनतून, संविता आश्रम (पणदूर) व सक्षम आश्रम किनलोस येथे प्रत्यक्ष भेट देऊन जीवनाआवश्यक वस्तू व साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी या उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी संघटना व प्रथम वर्ष डी फार्मसी चे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर मडूरकर, प्रकाश चव्हाण, श्रीकृष्ण धुरी, सौं मृणाली पालव, प्रियांका यादव, प्रशांत जाधव, प्रथमेश पवार आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.