You are currently viewing सज्ज रहा

सज्ज रहा

*मनस्पर्शी साहित्य परिवाराचे सन्माननीय प्रशासक लेखक कवी राजेश नागुलवार उर्फ राजमन लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सज्ज रहा* 

 

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी |

मनापासून सज्ज रहा दोस्त हो ||

 

राजनैतिक वातावरण बदलण्या |

सर्वांनी आज एकत्र येणे गरजेचे ||

झाले गेले विसरून जनमताने |

बीज पेरूया भारतीय समानतेचे ||

हा एकोपा नेत्यांना न येई रास्त हो ||

 

भगवद गीतेचे सर्व सार समजा

त्यातील उपदेश मनात गिरवा

कुराण देतो काय संदेश आपणा

प्रत्येक कलमा अंतरी जिरवा

हेवेदावे विसरून जगा मस्त हो

 

बुद्धाची शिकवण सर्वांकरिता

धम्म सांगतो प्रज्ञा शील करुणा

येशुप्रमाणे आप्तांना माफ करणे

इतकी बुद्धी दे प्रत्येक तरुणा

शत्रूंना ओळखाया शिका जास्त हो

 

जुने वर्ष संपताना उचला शपथ

स्वार्थी नेत्यांना न घ्यावे पदरी

भारतीयांच्या भावनांशी खेळले

वाजवून काढा त्यांची खंजरी

जनमताने करा त्यांना परास्त हो

_________________________

 

*राजेश नागुलवार उर्फ राजमन, वर्धा*

*9175229509*

प्रतिक्रिया व्यक्त करा