युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण
मुंबई
‘युपीएससी’ तर्फे घेतल्या गेलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 या परीक्षेचे निकाल घोषित झाले आहेत. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई येथे मुलाखत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ.भावना पाटोळे यांनी कळविले आहे.
या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी दि. 2 जानेवारी 2025 पूर्वी siac@1915@gmail.com या ई-मेलवर अर्ज करावेत. मुलाखत प्रशिक्षण नोंदणीसाठी www.siac.org.in या संकेतस्थळावरील सूचनांचे अवलोकन करावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 022-22070942 येथे संपर्क साधावा असे संचालक, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई यांनी कळविले आहे.