You are currently viewing मिलाग्रिस हायस्कूला “ग्लोबल स्कूल अवॉर्ड”ने सन्मानित…

मिलाग्रिस हायस्कूला “ग्लोबल स्कूल अवॉर्ड”ने सन्मानित…

मिलाग्रिस हायस्कूला “ग्लोबल स्कूल अवॉर्ड”ने सन्मानित…

सावंतवाडी

रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत मिलाग्रिस हायस्कूलच्या १७ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. यात कोमल लिंगो डांगी हिने द्वितीय तर अस्मि गजानन राणे व ओवी लक्ष्मण मालवणकर विद्यार्थिनींनी इंटरनॅशनल आर्ट मेरिट अवॉर्ड प्राप्त केले.

तसेच कु.दिव्या दीपक जोशी, दिव्या संतोष राऊळ, अबान इलियास बेग, जेनेलिया जाँनीनेरो नाडार, वेदांत राजेश गवस, वैष्णवी महादेव राणे, ओमकार नागराज चंद्रप्पागोल, प्रिया प्रदीप देसाई, लक्षिता मुरलीधर बुगडे, किमाया पीटर लोबो, काव्या संतोष सावंत या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल मेडल प्राप्त केले.

तर कु. शनायज डायगो, सेनोरिटा झेवियर फर्नांडिस, श्रीराम मायप्पा पाटील या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले आहे. मिलाग्रिस प्रशालेला देखील ‘ग्लोबल स्कूल अवॉर्डने’ सन्मानित करण्यात आले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदाना, उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा