You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस मशीन द्या – सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांची मागणी..

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस मशीन द्या – सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांची मागणी..

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस मशीन द्या – सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांची मागणी..

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे डायलिसिस विभागाचे चार मशिनरी आहेत त्यापैकी एक डायलिसिस ची मशीन गेल्या आठ दिवसांपूर्वी नादुरुस्त झाल्याने अनेक वर्षे हे मशीन रुग्णांना सेवा देत आहे ही मशनरी रिपेरिंग होण्यासारखी नाही.ही मशिनरी दहा वर्षे हून अधिक वर्षे रुग्णांना सेवा देत आहे. त्यामुळे या मशिनरीची गॅरंटी पिरेड संपलेला आहे व अशा प्रकारची जिल्हा रुग्णालयाचे डायलिसिस विभागाचे टेक्निशियन यांनी रिपोर्ट देऊन नवीन मशनरी मिळण्यासाठी डायलिसिस विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलेली आहे.

यामुळे नवीन मशनरी डायलिसिस मिळेपर्यंत येणारे रुग्ण यांना आर्थिक परिस्थितीमुळे अडचण होणार आहे ही बाब जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांना रुग्णांची नातेवाईकांनी माहिती दिल्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर गिरीश चौगुले यांना सविस्तर माहिती दिल्यानंतर व तशा प्रकारचे रुग्णालयाचे डायलिसिस विभागाचे टेक्निशन यांनी रीत सर सावंतवाडी कार्यालयामध्ये अर्ज लेखी दिल्यानंतर सावंतवाडी चे अधीक्षक डॉक्टर गिरीश चौगुले यांना जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन यांना रीतसर नवीन डायलिसिस विभागाची मशीनरी खरेदी करण्यासाठी मागणी करण्यासाठी मसुरकर यांनी सांगण्यात आले आहे त्यानंतर जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांना मोबाईल वरती सविस्तर माहिती देण्यात आली.

त्यानंतर त्यांना जिल्हा नियोजन मार्फत किंवा सी एस आर फंड तसेच शासनामार्फत 15 लाख रुपयांची मशनरी नवीन खरेदी करण्यासाठी मागणी करण्याचे सांगण्यात आले आहे.

यासाठी जिल्हा नियोजन ची मीटिंग मार्चमध्ये होणार आहे तसेच त्याआधी लवकर डायलिसिस ची मशीन मिळण्यासाठी शासनामार्फत सुद्धा किंवा सीएसआर फंड मधून लवकरात लवकर खरेदी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे सिविल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांना आश्वासन देण्यात आले आहे.

यामुळे लवकर डायलिसिस विभागाची एक मशीन लवकरात लवकर चालू व्हावी यासाठी कसोशीने प्रयत्न मसुरकर हे करणार आहेत.

जेणेकरून डायलिसिस विभागाचे रुग्ण यांना खाजगीरित्या आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस करणे आर्थिक दृष्ट्या न परवडणारे आहेत.

*यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी प्रयत्न चालू केले आहे.*

*आपला विश्वासू*
*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष*
*उभाबाजार, सावंतवाडी*
*मो.9420435760*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा