You are currently viewing पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी २० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ…

पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी २० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई

विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागातील पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी २० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे,अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. श्री.सामंत म्हणाले, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील उच्च व तंत्रशिक्षण विभागातील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रवेश घेणाऱ्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या उमेदवारांसाठी E205 मुळ प्रमाणपत्र, nce मुळ प्रमाणपत्र, मुळ जात पडताळणी प्रमाणपत्र (CCC) सादर करण्यासाठी दिनांक २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेतला असून याचा सर्व बाधित विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा