You are currently viewing शिरोडा नाका परिसरात दोन दुचाकीत झालेल्या भीषण अपघातात एकजण गंभीर जखमी

शिरोडा नाका परिसरात दोन दुचाकीत झालेल्या भीषण अपघातात एकजण गंभीर जखमी

शिरोडा नाका परिसरात दोन दुचाकीत झालेल्या भीषण अपघातात एकजण गंभीर जखमी

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील सालईवाडा शिरोडानाका येथे दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले. तर एक किरकोळ जखमी झाला. ओंकार विजय पांढरे ( २३, रा. कोनापाल, निरवडे ) व बाबुराव नाईक ( २५, रा. कोलगांव ) अशी त्यांची नावे आहेत. तर उदय रेडकर हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध न झाल्याने पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर हे आपल्या दुचाकीने गंभीर जखमी ओंकार पांढरे याला घेऊन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आले. तर इतर जखमीनाही खाजगी वाहनाने रुग्णालयात आणण्यात आले. यातील ओंकार पांढरे व बाबुराव पाटील या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही तत्काळ अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा