*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सांजवेळ*
होता सांज चाललो माघारा घरा
मन आज जरा उदास उदास
हुरहुर अनामिक काही कळेना
लावितो किती कयास कयास….
मिळावी कशी कामातून उसंत
करी जीवतोड प्रयास प्रयास
धडपड हवेहवेसे यावे सुख
सर्वांच्या वाट्यास वाट्यास….
आईचे औषध, बाबांचा चष्मा,
प्राधान्य देऊ कशास कशास
अनावश्यक गोष्टींचा कोणासच
नाही हव्यास हव्यास हव्यास….
शोधला योग्य तोडगा समस्येसाठी
हसरी तोंडे स्वागतास स्वागतास
आले समोर गरम गरम जेवण
होत जोडतो देवास देवास…..
विजया केळकर______
नागपूर