बुलढाणा :
दि ३० डिसेंबरला साखरखेर्डा येथे राज्य स्तरीय पुरस्कार सोहळ्यात उपस्थित मानवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणी, व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यात कवी शाहीर मनोहर पवार केळवद यांना राज्यस्तरीय काव्य रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
दैनिक भारतसंग्राम च्या वतीने स्व. मधुकरराव खंदारे प्रथम स्मृतीप्रित्यर्थ तसेच सावित्रीबाई फुले जयंती निमीत्त आणि समाज भूषण अर्जुनराव गवई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील अतुलनिय कामगीरी करणाऱ्या व्यक्तींचा गुण गौरव व्हावा या हेतूने राज्यस्तरीय पुरस्कारचे आयोजन साखरखेर्डा गावी करण्यात आले त्यात शाहीर अण्णा भाऊ साठे काव्यरत्न पुरस्कार ‘ केळवद गावचे कवी शाहीर मनोहर पवार यांना उपस्थित मानवर मा . संजय खडसे उपविभागीय अधिकारी याच्या हस्ते उदघाटक मा. रविकांत तुपकर स्वागत अध्यक्ष, दिलीप खंजरे, रावसाहेब देशपांडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, सय्यद रफिक उप सरपंच, प्रमुख अतिथी गजानन करेवाड ठाणेदार, अर्जुन गवई,प्रकाश शिंदे, अँड. वर्षाताई कंकाळ, डॉ निवृत्ती जाधव विठ्ठल परिहार, समय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते . शाहीर कवी मनोहर पवार यांनी एक हजार विविध काव्य रचना केल्या असून महाराष्ट्रात वेगवेगळ्या साहित्य संमेलनात सादर केल्या आहेत चार आंतरष्ट्रीयकाव्य संमेलनात सहभाग नोंदविला असून काव्य रचना विविध साहित्य अंक यात प्रसिद्ध होत आहे . त्यांना या पूर्वीच अनेक राज्यस्तरीय पुरस्कार, सन्मान प्राप्त झाले आहेत . त्यांच्या ज्वलंत विषयांवरील कविता भाष्य, तसेच लेखन अधोरेखीत करणारे आहे . तसेच त्यांनी विविध संमेलन आयोजित करून माय मराठीची गोडी निर्माण व्हावी या करीता प्रयत्न करीत आहे .