*दोडामार्ग हायस्कुल चे श्री.आनंद म्हावळणकर यांना”आदर्श शिक्षकेतर गुणवान “पुरस्काराने सन्मानीत*
दोडामार्ग
दोडामार्ग इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दोडामार्ग मध्ये गेली 30 वर्षे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून सेवाभावीवृत्तीने सेवेत कार्यरत असलेले श्री.आनंद राघोबा म्हावळणकर यांना नुकताच शिक्षण प्रसारक मंडळ -सावंतवाडी या संस्थेचा आदर्श शिक्षकेतर गुणवान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
शिक्षण प्रसारक मंडळ,सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज,सावंतवाडीच्या वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळ्याचे औचित्य साधून पुरस्कार व सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले,संस्थेचे अध्यक्ष -मा.श्री विकासभाई सावंत,सावंतवाडीचे तहसिलदार-मा.श्री श्रीधर पाटील,संस्थेचे सचिव -मा.श्री.व्ही.बी.नाईक,उपाध्यक्ष -मा.डॉ.दिनेश नागवेकर,खजिनदार-मा.श्री.सी.एल.नाईक,शालेय समिती अध्यक्ष -मा.श्री.अमोल सावंत या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
पुरस्कार वितरण वेळी श्री.म्हावळणकर यांची आई-श्रीमती -सावित्री राघोबा म्हावळणकर,पत्नी-सौ.अनघा आनंद म्हावळणकर व मुलगा -राघोबा आनंद म्हावळणकर,बहिण -सौ.रसिका जनार्दन मांजरेकर,सौ.वर्धा लवू गुळेलकर तसेच मुख्याध्यापक -श्री.प्रल्हा सावंत, व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
त्यामुळे दोडामार्ग हायस्कूलमध्ये नुकतेच श्री.आनंद म्हावळणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.सोमनाथ नाईक व माजी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष -विठ्ठल गवस,शिक्षक -श्री.रमाकांत जाधव,सौ.प्रतिक्षा नाईक,श्री.उराडे सर,श्री.तुळशीदास राऊळ सर,सौ.आराध्या प्रभू,सौ.स्नेहल गवस,सौ.चैताली सावंत,सौ.दिप्ती गवस उपस्थित होते.