You are currently viewing बांद्यातील रक्तदान शिबिरात २५ दात्यांचे रक्तदान…

बांद्यातील रक्तदान शिबिरात २५ दात्यांचे रक्तदान…

बांद्यातील रक्तदान शिबिरात २५ दात्यांचे रक्तदान…

बांदा

दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २५ दात्यांनी रक्तदान केले.

गोवा बांबोळी मेडिकल रुग्णालयच्या रक्तपेढीने रक्त संकलन केले. रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने कमी वेळेत हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. २५ दात्यांनी यावेळी रक्तदान केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष शैलेश लाड, सिंधु रक्तमित्रचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, तालुका अध्यक्ष सुनील राऊळ, रक्तदाते सुधीर पराडकर, तालुका कार्यकारिणी सदस्य अक्षय मयेकर, युनिक फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश मोरजकर, प्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, शिक्षक जे. डी. पाटील, लाड मित्रमंडळाचे सचिव संदीप नार्वेकर, कर सल्लागार समीर परब, राकेश परब, प्रशांत गवस आदिसह रक्तदाते व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा