You are currently viewing सडूरे सोनधरणे-तांबळघाटी उर्वरित रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम सरपंच दिपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

सडूरे सोनधरणे-तांबळघाटी उर्वरित रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम सरपंच दिपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

*सडूरे सोनधरणे-तांबळघाटी उर्वरित रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम सरपंच दिपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न*

*मंत्री नितेश राणे साहेब यांच्या निधीतून रस्त्या कामाला मंजुरी*

*भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या प्रयत्नांना यश*

*भाजपा पंचायत समिती खांबाळे शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील यांचे विशेष सहकार्य*

*2022 रोजी ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणूक वेळी दिलेल्या वचनाची विद्यमान ग्राम पंचायत सदस्या विशाखा नवलराज काळे यांच्या कडून वचनपूर्ती*

*वैभववाडी-*

ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे असलेल्या सौ विशाखा नवलराज काळे यांनी जनतेला निवडणुकीदरम्यान दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे. प्रचारादरम्यान उर्वरित रस्ते पूर्ण करून देण्याचा शब्द ग्रामस्थांना श्री नवलराज काळे यांनी सौभाग्यवती विशाखा काळे यांच्या निवडणुकीदरम्यान दिला होता. महाराष्ट्र शासनाचे मंत्री सन्माननीय नितेश राणे साहेब यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक दोन मधील सोनधरणे तांबळघाटी या दोन्ही रस्त्यांना निधी उपलब्ध झाला असून सदर कामाचा निधी भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला आहे. या कामासाठी खांबाळे पंचायत समिती शक्ती केंद्रप्रमुख श्री प्रकाश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.या दोन्ही रस्ता कामांचा शुभारंभ ग्रामपंचायतचे सरपंच दीपक चव्हाण व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याआधी प्रभाग क्रमांक दोन मधील राणेवाडी चव्हाणवाडी रस्ता देखील सन्माननीय राणे साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला. याबाबत सन्माननीय राणे साहेबांचे व भारतीय जनता पार्टीचे प्रभाग सदस्य म्हणून विशाखा नवलराज काळे यांनी विशेष आभार मानले.
या भूमिपूजन कार्यक्रमावेळी बोलत असताना भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी देऊ शकतो तो पूर्ण करू ह्या राणीसाहेबांचे ब्रीद वाक्य उराशी बाळगून राणीसाहेबांशी एकनिष्ठ राहून आम्ही दोघे दांपत्य जनतेमध्ये जनतेची सेवा करण्यासाठी कार्यतत्पर राहू. “सत्ता कोणाचीही असो चालवणार ती आम्हीच” हे राणेसाहेबांचं वाक्य नेहमीच आम्हाला प्रेरणा देत. याआधी सत्तेत नसताना जनतेची कामे मार्गी लावली. म्हणूनच आम्हा दोघांना 2022 रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भरघोस मताने आपण निवडून दिले. याला 27 डिसेंबर रोजी दोन वर्षे पूर्ण होत. अजून आमच्याकडे तीन वर्षाचा कार्यकाल आहे व आमचे नेते सत्तेत आहोत. नेत्यांसहित भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आमच्या सोबत ठामपणे आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितपणाने सांगाल ते काम होईल, विकास कामांना निधी मिळेल आजपर्यंत जसा आशीर्वाद आपण आमच्या पाठीशी ठेवलात तसाच आशीर्वाद नेहमीच आपण जनतेने आमच्या पाठीशी ठेवावा. सन्माननीय राणे नितेश साहेब मंत्री आहेत भारतीय जनता पार्टी आमच्या पाठीशी कायम आहे या सर्वांच्या माध्यमातून भरघोस निधी ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे येथील दोन्ही गावाला आणण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहणार असे वचन नवलराज काळे यांनी कार्यक्रम स्थळी दिले. यावेळी सरपंच दीपक चव्हाण,वि.न काळे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे,ग्रामपंचायत सदस्या सौ विशाखा काळे, जनार्दन काळे, रामचंद्र बोडेकर, देऊ काळे, बाळकृष्ण अंबरी बोडेकर, राजू कोकरे,गंगाराम बोडेकर (मावळतले) लहू काळे, विजयसिंह काळे, बाळकृष्ण (बाबा) बोडेकर, जयसिंह काळे, बाळकृष्ण रवळू बोडेकर, राजाराम काळे, ॲड. विक्रमसिंह काळे,सुनंदा बोडेकर, आनंद काळे,सुरेखा काळे,मीनाक्षी काळे, रविराज काळे, अर्जुन अजितसिंह काळे वंदना काळे, हर्षद बोडेकर, गंगाराम बोडेकर व सोनधरणे तांबळघाटी दोन्ही वाडीतील कार्यक्रम प्रत्येकाच्या वाडीत ठिकाणी झाले ज्या त्या वाडीतील ग्रामस्थ आप आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

फोटो
1) सोनधरणे येथील भूमिपूजन
2) तांबळघाटी येथील भूमिपूजन

प्रतिक्रिया व्यक्त करा