*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मिथकांची जातकुळी….!!!*
आयत्या पीठावर रेखा ओढण्यात
काॅमनमॅनचं आयुष्य निघून जाते
दिवस मावळण्याची वाट पाहत
गर्दी आजूबाजूची वाढत जाते..
मिथकांचा वैराण प्रांत तुडवतं
खिळेदार जोडे खुंटीवर टांगतो
कष्ट वेदना अवहेलना अपमानांची
विषारी वेटोळी उलगत जातो..
वास्तवाच्या खडकावर मिथकांची निर्मिती कडेकपारीतचं जन्मते
मिथकांना कधीच मरण नसतं
बघता बघता कमलकोषांत फोफावते
मौनातून येणारी शांतता मिथकांच्या
नादरूपात सदा चिरंजीव राहते
चुकीच्या समेवर आघात करत
मिथकांची जातकुळी वाढत जाते
अहंकार मिथकांचा येतो ही क्षणिक
त्याचं त्यांनाही कळतं नाही
स्वामित्वाच्या नावाखाली खपवून घेत
भावनांच्या बाजारात हा ब्रॅण्ड कधीच खपत नाही..
साधासुधा माणूस…काॅमनमॅनला.
यातलं कधीच काही कळतं नाही..
बाबा ठाकूर धन्यवाद