*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”प.पु.स्वामी स्वरूपानंद महाराज जयंती निमित्त गीत”*
स्वरूपानंद स्वामींना करूया वंदन
करावे सोहम हंसा मुखे उच्चारणIIधृII
जन्मले रत्नागिरी पावस खेडेगावांत
लाभले मातपिता रखमाबाई विष्णुपंत
रामचंद्रांना बाल्यापासून गीताध्यानी छंदII1II
जाहले प्राथमिक शिक्षण रत्नागिरीत
गीता ज्ञानेश्वरी दासबोध गोडी वाचनांत
मुंबईत जाहले विद्यालयी उच्चशिक्षितII2II
स्वातंत्र्य संग्रामात सहभाग केले आंदोलन
गुरु लाभले केशवमामांचे मार्गदर्शनांनं
नाथ बाबा महाराजांनी केले अनुग्रहितII3II
पावसला स्वावलंबनाश्रम केला स्थापन
विद्यार्थ्यांना दिले बहुविध अभिनव शिक्षण
समाजासाठी केले राष्ट्रीय मेळे प्रवचनII4II
उडी घेतली त्यांनी सत्याग्रह चळवळीत
कारावास भोगला स्वामींनी स्वातंत्र्यार्थ
कारावासी जपती सोहम मंत्र अखंडII5II
सद्गुरूंनी स्वरूपानंद केले नामा भिधान
लिहिली पदे अमृतधारा स्फुट काव्य ग्रंथ
भावार्थ गीता संजीवनी गाथा अभंगानुवादII6II
स्वामी म्हणती करावा संत सत्संग जपा मंत्र
भक्तांसाठी रचिला ज्ञानेश्वरी नित्य पाठ
ओम रामकृष्ण हरी मंत्र दिला केले कल्याणII7II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.