You are currently viewing विमान रनवेवर उतरताच भिंतीला धडकलं

विमान रनवेवर उतरताच भिंतीला धडकलं

विमान रनवेवर उतरताच भिंतीला धडकलं,

१७९ जणांचा मृत्यू

प्रवाशांना घेऊन जाणारे विमानाचा लँडिंगवेळी भीषण अपघात झालाय. दक्षिण कोरियामध्ये रविवारी झालेल्या या अपघाताच्या दुर्देवी घटनेत आतापर्यंत १७९ जणांचा (South Korea palne crash 179 dead) मृत्यू झाल्याचं वृत्त the guardian यांनी दिले आहे.

फक्त दोन जणांना वाचवण्यात यश आलेय. रनवेवर लँडिंगवेळी विमानात अचानक स्फोट होऊन आग लागली. विमान रनवेवरील भिंतीला जाऊन धडकले अन् चिंधड्या झाल्या. या भयंकर अपघातामध्ये आतापर्यंत १७९ जणांनी जीव गमावलाय. अपघातामधील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.

गेल्या आठवड्यात कझाकिस्थानमध्ये झालेली विमान दुर्घटना ताजी असतानाच दक्षिण कोरियामध्ये (South Korea) आज लँडिंगवेळी मोठी विमान दुर्घटना झाली. लँडिंगवेळी विमानतळावरच विमान क्रॅश झालेय. दक्षिण कोरियामधील दक्षिण-पश्चिमी परिसरातील मुआन विमानतळावर हा दुर्देवी अपघात झाला. यामध्ये आतापर्यंत १७९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत फक्त दोन जणांना वाचवण्यात आलेय. या दोन्ही जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.

अपघात नेमका कशामुळे झाला?

दक्षिण कोरियामध्ये विमान लँडिंगवेळी झालेल्या दुर्घटनेविषयी वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. स्थानिक स्थानिक अग्निशमन अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पक्ष्यांच्या धडकेमुळे आणि प्रतिकूल हवामानामुळे मुआनमध्ये जेजू एअर क्रॅश झाल्याची शक्यता आहे. अपघाताचे कारण प्रतिकूल हवामानासह पक्ष्याने धडक दिल्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

दक्षिण कोरियातील yonhap या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमानात १८१ जण प्रवास करत होते. त्यामध्ये १७५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. ही दुर्घटना दक्षिण-पश्चिमी शहरातील मुआन विमानतळावर घडली. यामध्ये १७९ जणांचा मृत्यू झाला. एक क्रू मेंबर आणि एका प्रवाशाला वाचण्यात यश आलेय. लँडिंगच्या वेळी रनवेवर अचानक विमान विमानतळाच्या भिंतीला जाऊन धडकले. जेजू एअरचे विमान थायलंडबून परत येत असताना मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झालाय. लँडिंग करताना विमान धावपट्टीवर घसरले अन् भींतीला जाऊन धडकले.

प्रतिक्रिया व्यक्त करा