माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
सावंतवाडी :
आमदार दीपकभाई केसरकर मित्र मंडळ, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी २९ डिसेंबर ते १ जानेवारीला ‘सावंतवाडी महोत्सव २०२४’ चे आयोजन जगन्नाथ राव भोसले शिव उद्यान येथे करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री दीपकभाई केसरकर, कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी ६.०० वाजता होणार आहे.
या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीकरांसह त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध फूड स्टॉल, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेण्याचे आवाहन दीपकभाई केसरकर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
रविवारी २९ डिसेंबर २०२४ रोजी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित साज – ए – संगीत सुर नवा ध्यास नवा आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गायिका धनश्री कोरगावकर यांची मधुर संगीत मैफिल
३० डिसेंबर २०२४ रोजी इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित ब्युटी कॉन्टेस्ट / मिस सुंदरवाडी २०२४
३१ डिसेंबर २०२४ रोजी आवाज आर्ट इव्हेंट निर्मित बेधुंद २०२५ (जल्लोष नववर्षाचा) हिंदी मराठी, गीत नृत्यांची बेधुंद मैफिल (इंडियन आयडॉल फेम राहुल खरे, सुर नवा ध्यास नवा महाविजेती सुष्मिता धापटे-शिंदे, सारेगमप मराठी फेम ब्रह्मानंदा पाटणकर, गोवा आयडॉल फेम समृद्ध चोडणकर)
१ जानेवारी २०२५ रोजी जल्लोष नववर्षाचा… सन्मान महिलांचा सावंतवाडीत रंगणार महिलांकरिता खेळ महापैठणीचा
विजेती – आकर्षक भरजरी पैठणी
उपविजेती – आकर्षक भरजरी पैठणी
तृतीय विजेती – मिक्सर
उत्तेजनार्थ तीन स्पर्धकांना मिळणार एक ग्राम प्लेटेड सोन्याची नथ देण्यात येणार आहे.