You are currently viewing युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

सावंतवाडी :

 

विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आम्ही विकासाला महत्त्व देतो त्यामुळे अनेकजण आज भाजपात प्रवेश करत आहेत. येणाऱ्या काळात विकासाची गंगा गावागावापर्यंत पोहोचवली जाणार आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत मोदींना साथ देण्यासाठी नारायण राणे यांना मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी नेमळे येथे केले.

नेमळे वेंगुर्लेकरवाडी येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व नेमळे गावचे माजी सरपंच विनोद राऊळ, ॲड. अनिल निरवडेकर यांच्या माध्यमातून विशाल परब यांच्या उपस्थितीत ठाकरे सेनेचे शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला यावेळी ते बोलत होते. त्याच्यासोबत व्यासपीठावर ॲड अनिल केसरकर गाव अध्यक्ष मनोहर राऊळ आदी उपस्थित होते. श्री परब पुढे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचारावर प्रेरित होऊन आज असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल होत आहेत. आजचा हा प्रवेश म्हणजेच त्याचेच फलित आहे. निश्चितच भाजपावर टाकलेला विश्वास पाहता भाजपाचा कार्यकर्ता म्हणून विशाल परब नेमळे गावाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा