You are currently viewing भविष्यात भारतगड इंग्लिश मीडियम मसुरे मर्डे ही प्रशाला राज्यामध्ये नावारूपात येणार

भविष्यात भारतगड इंग्लिश मीडियम मसुरे मर्डे ही प्रशाला राज्यामध्ये नावारूपात येणार

प्रकाश परब यांचा आत्मविश्वास

 

मसुरे :

 

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित ठेवून तन-मन-धन अर्पण करून अभ्यास केल्यास जीवनात यशस्वी होता येतं. इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून मसुरे गावामध्ये शिक्षणाची क्रांती घडविण्यात आमच्या या इंग्लिश मीडियम चा वाटा मोठा आहे. प्रशालेच्या उन्नतीसाठी आपण सर्वांनी चांगले काम करून एक आदर्श शाळा निर्माण करूया. या पुढे सुद्धा शिक्षण क्षेत्रात या प्रशालेची भरारी अशीच सुरू राहील असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलचे शाळा कमिटी अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी मसुरे मर्डे येथे बोलताना केले.

माता काशीबाई महादेव परब मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित भरतगड इंग्लिश मीडियम मसुरे मर्डे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश परब यांच्या अध्यक्षतेखाली मसुरे मर्डे येथे शाळा पटांगणात पार पडले. यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष प्रकाश परब म्हणाले आदरणीय जयवंत परब साहेब यांनी या इंग्लिश मीडियम चे रोपट लावलं असून आज याचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. मला अभिमान आहे की माझ्या गावामध्ये आज इंग्रजी माध्यमातून गोरगरीब होतकरू मुलं शिक्षण क्षेत्रामध्ये भरारी घेत आहेत. यापुढे सुद्धा येथील सर्व विद्यार्थ्यांच्या मागे, शिक्षक,पालक,ग्रामस्थ यांच्या मागे एक संस्था अध्यक्ष म्हणून मी खंबीरपणे उभा असून शिक्षण क्षेत्रात जे जे काही करता येईल ते मी सर्व तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून करून भविष्यात भरतगड इंग्लिश मीडियम मसुरे मर्डे ही प्रशाला राज्यामध्ये नावा रुपास आणण्याचा प्रयत्न करेन. आज येथील सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ, संस्थाचालक, संस्था सभासद यांच्या सर्वांच्या सहकार्याने या प्रशालेचे काम अतिशय कौतुकास्पद सुरू आहे. या सर्वांना यापुढे सुद्धा संस्था अध्यक्ष म्हणून नेहमीच माझे सहकार्य राहील. यावेळी विद्यार्थ्यांच्या आविष्काराने सर्वांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे उद्घाटन श्री संग्राम प्रभूगावर यांनी श्रीफळ वाढवून केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. सर्व मान्यवरांचा सत्कार आणि स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी मुख्याध्यापक श्री .किशोर देवुलकर,शिक्षिका सिस्टर कांता, केशव भोगले, माजी उपसरपंच राजेश गावकर, माजी सरपंच लक्ष्मीताई पेडणेकर, राजन परब, विश्वनाथ परब, श्रीराम परब, संतोष सावंत,पूजा ठाकूर, वेरली सरपंच धनंजय परब, वडाचा पाट सरपंच सोनिया प्रभु देसाई, किशोर देऊलकर, मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर, रेश्मा बोरकर पेडणेकर, पार्वती कोदे, काव्या देऊलकर, संजना प्रभूगावकर, गौतमी प्रभूगावकर, रसिका मेस्त्री, सविता मेस्त्री, समीर गोसावी, स्वरांजली ठाकूर, स्टेला लोबो,विभावरी पराडकर, श्रुतिका लाड, वसंत प्रभूगावकर, अमोल परब, समीर सावंत, प्रिया पाटकर, स्वरा चव्हाण, शाळा समिती सदस्य, माता काशीबाई महादेव मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, पालक, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. तसेच पंचक्रोशीतील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीम.संतोषी मांजरेकर त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना कला, क्रीडा, स्पर्धा परीक्षा तसेच तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये मिळालेल्या बक्षिसांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्याचबरोबर यावर्षी आदर्श विद्यार्थी पुरस्कार गटांनुसार देण्यात आले.

यावेळी संस्था अध्यक्ष प्रकाश परब यांचा हृदय सत्कार संग्राम प्रभू गावकर यांच्या हस्ते करण्यात आला. नर्सरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपले विविध कला गुण सादर केले. यात प्रामुख्याने नृत्य, नाटिका, गीत गायन, वाद्य वादन अशा विविध रंगी कार्यक्रमामुळे वार्षिक स्नेहसंमेलन आनंददायी वातावरणात पार पडले. यात प्रामुख्याने वारकरी दिंडी आकर्षणाचा विषय ठरली.

पालकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली म्हाडगुत व सिद्धी मिस्त्री यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, सर्व सदस्य, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा