एकाच दिवशी दहा पुस्तकाचे प्रकाशन हा खरोखरच विश्वविक्रमात मानावे लागेल. हा सुवर्णयोग एका लेखिकेच्या वाट्याला आलेला आहे .या दहा पुस्तकाचे लेखन करणाऱ्या प्रा, डॉ शोभा गायकवाड ह्या खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान सुसंस्कारयुक्त सामाजिक जाणीव ठेवणा-या लेखिका आहेत. यजमानाच्या निधनानंतर खचून न जाता खंबीरपणे उभे राहून आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षण देऊन व त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास समर्थ करून ह्या लेखिकेने आपला लेखनाचा प्रपंच उत्कृष्टपणे सांभाळला आहे. अमरावतीच्या ह्या लेखिका असल्या तरी यांचा वावर संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्य विश्वात आहे.विशेष म्हणजे केंद्र सरकारने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरविले आहे. अमरावतीच्या श्री समर्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व नंतर अमरावतीच्या सुप्रसिद्ध अशा ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात त्यांनी मराठीचे अध्यापन समर्थपणे केले आहे. एक अध्यापिका म्हणून त्या सफल आहेतच. परंतु त्याचबरोबर त्यांनी केलेले लेखन देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. नुकताच त्यांना अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी ह्या राष्ट्रीय संस्थेने ग्रामगीताचार्य ही मानाची उपाधी देऊन त्यांच्या भव्य राष्ट्रीय कार्यक्रमात गौरविले आहे. काही लेखक असे असतात की जे ओढून काढून लिहितात. काही लेखक असतात ते मनापासून लिहितात. हृदयापासून लिहितात. अंतरंगातून लिहितात. त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर शोभा गायकवाड यांचा उल्लेख करावा लागेल. स्वतः संस्थेतील नोकरी सांभाळून मुलांना सांभाळून त्यांनी आपला लेखन प्रपंच केला आहे. वाचन आणि लेखन आणि चळवळ हा त्यांचा पिंड आहे. या छंदासाठी त्यांनी नियमितपणे वेळ काढलेला आहे. यापूर्वीही त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना लोकमान्यता मिळालेली आहे. संत श्री तुकाराम महाराज यांनी लिहिलेला ग्रंथ कोल्हापूरच्या एका प्रकाशनाने प्रकाशित केला असून त्या पुस्तकाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. खरं म्हणजे गृहिणी म्हटल्या की त्यांच्यामागे संसाराच्या तुरुंगामध्ये कैद तुला झाली अशीच गत वाटायला येते. पण शोभा गायकवाड त्या चौकटीत कधी बंदिस्त झाल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या ठिकाणी असलेल्या लेखन कौशल्याला सतत विकसित करण्याचा व लोकांसमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे व त्या त्यात यशस्वी झालेल्या आहेत. त्यांच्याकडे आपण केव्हाही गेलात तर त्या वाचन करताना दिसतील किंवा लेखन करताना दिसतील. या गोष्टीचा फायदा त्यांना परिवारात पण झालेला आहे. त्यांची मुले स्वप्ना अबोली अजिंक्य यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड लागलेली आहे. त्यांचे यजमान श्री राजाभाऊ गायकवाड यांनी सातत्याने त्यांना प्रोत्साहन दिले आहे. आपल्या पत्नीने मोठा वक्ता व्हावे मोठी साहित्यिक व्हावे यासाठी या माणसाने केलेली धडपड नोंदणीय आहे. ज्या काळामध्ये वाहनांची वर्दळ नव्हती त्या काळात हा माणूस शोभाताईंना वेगळ्या कार्यक्रमात नेणे प्रोत्साहन देणे यासाठी सतत धडपळत होता. आज राजाभाऊ आमच्यात नाहीत. पण त्यांनी केलेल्या प्रोत्साहनामुळे शोभाताई ह्या ही उंची गाठू शकलेल्या आहेत. खरं म्हणजे राजाभाऊंच्या निधनानंतर शोभाताईंनी निराश न होता खचून न जाता खंबीरपणे उभे राहून आपल्या मुलांना तर शिकवलेच आणि स्वतःला पण एक समर्थ लेखिका म्हणून उभे केले. खर म्हणजे हे कठीणच असते. मी अनेक लेखिकांना अनेक महिलांना यजमानाच्या निधनानंतर निराशेच्या गर्तेत जाताना पाहिले आहे. पण शोभाताईंनी राजाभाऊंच्या निधनानंतर स्वतःला सावरले आणि स्वतःला समर्थपणे उभे केले. एवढ्याच करून त्या थांबल्या नाहीत. तर आपल्या समवयस्क मैत्रिणींना सोबत घेऊन त्यांनी हितगुज संस्थेची स्थापना केली. शोभाताईंची आज ही संस्था अमरावती मधील प्रतिष्ठित संस्था आहे. या संस्थेचे शेकडो मेंबर आहेत. ही संस्था शोभाताईंनी महिलांपूरती मर्यादित ठेवलेली आहे .ह्या महिला दर महिन्याला एकत्र येतात. साहित्यिक सामाजिक उपक्रम राबवतात .त्यांना चालतं बोलतं करण्याची जबाबदारी शोभाताईंची. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी ऑनलाइनचा उपयोग करून या महिलांच्या लेखनाचा सामाजिक बांधिलकीचा उपयोग करून घेतला आहे. समाजातील लेखिकांना सामाजिक बांधिलकीच्या महिलांना एकत्र करून त्यांना सकारात्मक सामाजिक कार्यामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हितगुज करत आहे. अशा प्रकारची सातत्याने काम करणारी अमरावती शहरातील ही एकमेव संस्था आहे. आपल्या कौटुंबिक जबाबदारीतून आपल्या लेखन कौशल्यातून लेखन छंदातून त्यांनी हितगुज साठी जो वेळ काढलेला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आणि अभिनंदनआस पात्र आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी जे अध्यापनाचे काम प्रामाणिकपणे केले. जे विविध उपक्रम राबवले त्या उपक्रमाची दखल घेऊन शिक्षण खात्याने आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी त्यांचे नाव राष्ट्रपती भावनात पाठवले आणि राष्ट्रपती कार्यालयाने त्यांच्या कार्याचे दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरविले आहे. यजमान गेल्यानंतर देखील त्यांनी खचून न जाता आपल्या अध्यापन संस्थेत व आपल्या कौटुंबिक व सामाजिक कार्यात जो महत्वपूर्ण योगदान सहयोग दिला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने एका सामाजिक काम करणाऱ्या संवेदनशील मनाच्या सातत्याने लेखन करणाऱ्या महिलेचा हा गौरवच आहे. त्यांच्या लेखन कार्यास शुभेच्छा..!
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आय.ए. एस.
अमरावती
9890967003