*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निवांत सजते राया….*
फारच राया तुमची घाई, निवांत सजते राया
बघून माझ्याकडे कशाला वेळ घालवता वाया……
इंद्र दरबारीची परी मी, बघा मी सजते कशी
जवळ या ना गळ्यात माझ्या घाला सुंदर
ठुशी…मासोळ्या मी पायी घातल्या त्यावर
तुमची छाया….
फारच राया तुमची घाई….
गोठ पाटल्या हाती घाला राणी ना मी तुमची
छुम्मक छुम्मक पैंजण आणा चढेन माडीवरती
बघत रहाना माझ्याकडे हो,मोहरली मम काया..
फारच राया घाई तुमची…
रंभा उर्वशी काही म्हणा हो मदनाची मंजिरी
ठ्ठुम्मक पडता पाऊल माझे वाजवा ना खंजिरी
थाप पडता ढोलकी वरती लागतील पाय नाचाया…
फारच राया घाई तुमची…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)