You are currently viewing कलमठ सरपंच संदिप मेस्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

कलमठ सरपंच संदिप मेस्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

७५ रक्तदात्यानी केले रक्तदान

भाजपा सरचिटणीस संदिप साटम यांची प्रमुख उपस्थिती..

कणकवली :

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कलमठ श्री देव काशी कलेश्वर सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराचे उद्घाटन महेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा सरचिटणीस संदीप साटम यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, महेश लाड, संतोष पुजारे, सागर राणे, नितीन पवार, पप्पू यादव, सुप्रिया मेस्त्री, तेजस लोकरे, स्वाती नारकर, दिनेश गोठणकर, श्रेयस चिंदरकर, पत्रकार राजन चव्हाण, गुरू वर्देकर, मिलिंद गुरव, आबा कोरगावकर, मिलिंद चिंदरकर, उपस्थित होते.

शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष तेजस लोकरे, नितीन पवार, समीर कवठणकर, श्रेयस चिंदरकर, परेश कांबळी, समीर ठाकूर, स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर, विराज मेस्त्री, सचिन वाघेश्री, अभी साटविलकर, विठ्ठल चव्हाण यांनी मेहनत घेतली. यावेळी मंडळाच्या वतीने संदिप मेस्त्री यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा