कोरोनाचा कालावधी संपला अपूर्ण कामे पूर्ण; आता तरी जागे व्हा. आघाडी सरकारवर अतुल काळसेकर यांनी केली परखडपणे टीका केली आहे.
माणगाव खोर आणि कोल्हापूर यांच्या मधील दुवा असलेल्या अंजिवंडे घाटरस्त्याच काम महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत अपूर्णच..
कुडाळ :
गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पार्टीने अनेक घाटरस्थे आणि महामार्ग तसेच इतर वाहतूक सेवा पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. आज भाजपचे नेते तथा सिंधुदुर्ग बँक संचालक अतुल काळसेकर यांनी महाविकास आघाडीच्या कामकाजावर पत्रकार परिषद घेत वाभाडे ओढले. माणगाव खोर आणि कोल्हापूर यांच्या मधील दुवा असलेल्या अंजिवंडे घाटरस्त्याच काम महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत अपूर्णच राहिलं. दोन जिल्ह्यांना जोडला जाणारा घाटमार्ग अद्यापही आमदार खासदार यांच्या हलगर्जीपणा मुळं रखडला असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोना कालावधी निघून गेला आता अपूर्ण काम पूर्ण करा असा सल्ला देत आघाडी सरकार वर त्यांनी बोचरी अशी टीका केली.
आज कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. कोरोनाच्या लढाईतील हा महत्वाचा दिवस आहे असे सांगत भाजपने जवळजवळ पूर्णत्वास आणलेली सर्व कामे राज्य सरकारने कोरोनाचे कारण देत रखडवली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला त्यामुळे आता तरी रखडलेली कामे पूर्ण करा असे सांगत आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे .
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ह्या घाटाच्या सर्वैसाठी १२ कोटी निधीची तरतुद केली. त्यामुळे घोडगे सोनवडे घाटाचे काम सुरू झाले असून ते कामही अंतिम टप्प्यात आले होते पण निव्वळ श्रेय घेण्याच्या अट्टाहासापोटी शिवसेनेच्या खासदार व आमदारांना उद्घाटन करण्याची, भूमिपूजन करण्याची अतिशय घाई झाली असल्याने गेल्या वर्षभरात एकही काम पूर्ण झालेलं नसल्याचा थेट आरोप श्री काळसेकर यांनी केला.
त्याचबरोबर आकारीपडचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही, कबुलबागायतदारचा चौकुळ व आंबोलीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही त्यामुळे आघाडी सरकार ह्या चारही प्रश्नाकडे दुर्लक्ष करतय असा त्यांनी थेट यावेळी आरोप केला. ह्या चारही प्रश्नासंदर्भात खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ५६ ते ६१ ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता असेल असा दावा श्री काळसेकर यांनी केला. यावेळी दादा बेळणेकर, राजू राऊळ, संध्या तेरसे, विनायक राणे प्रभाकर सावंत, बंड्या सावंत, राकेश कांदे, विजय कांबळी, दादा साईल, राजवीर पाटील, अविनाश पराडकर आदी उपस्थित होते.