You are currently viewing भारत लष्कराच्या शस्त्र क्षमतेत आणखी वाढ होणार

भारत लष्कराच्या शस्त्र क्षमतेत आणखी वाढ होणार

भारत आणि रशिया मधे ऐके-४७ २०३ राफेल करार आता पूर्ण झाला

भारताचे संरक्षण मत्री राजनाथ सिंह सध्या रशियाच्या दौऱ्यावर

मुंबई / प्रतिनिधी :-

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे शांघाई सहकार्य संघटनेच्या (एसएचओ) बैठकीत सहभागी होण्यासाठी बुधवारी मॉस्कोत दाखल झाले आहेत. या दौऱ्यात भारत आणि रशियातही महत्त्वाचे करार होणार आहेत. ही राफेल हिमालय सारख्या डोंगराळ भागात जवानांसाठी फायदेशीर ठरणार आहे. चीन सोबत आणि लडाख आणि इतर सीमा लगतच्या भागात सुरु असलेला तणाव पाहता या कराराला विशेष महत्त्व आहे.

रशियन वृत्त संस्था स्पुटनिक नुसार भारतीय सैन्याला ७ लाख ७०हजार रायफलची आवश्यकता आहे. त्यापैकी एक लाख रायफल रशिया मधून आयात करणार आहे आणि उर्वरित रायफल ची निर्मिती भारतात इंडोनेशिया रायफल प्रायव्हेट लिमिटेडच्या (आय आर आर पी एल) संयुक्त विद्यमाने करण्यात येणार असून ऑर्डिन्स फॅक्टरी बोर्ड (ओ एफ बी)आणि का कन्सर्न व रोसोबोरोन एक्स्पोर्ट यांच्यात करार करण्यात आला आहे.

जगातील सर्वात आधुनिक आणि घातक रायफल पैकी ऐके २०३ रायफल एक आहे. ऐ के रायफल ची किंमत ही ११०० डॉलर पर्यंत असू शकते. ऐ के २०३ ही वजनाने हलकी आहे आणि या मधे ७.६२ एम एम च्या गोळ्यांचा वापर करण्यात येणार आहे. एस-४०० ही मिसाइल डिफेन्स सिस्टिम लवकरात लवकर मिळावी यासाठी भारताचा रशियाकडे आग्रह असणार आहे. या प्रणालीची पहिली खेप २०२१ च्या वर्षखेरपर्यंत मिळावी अशी अपेक्षा भारताला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा