देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन
नवी दिल्ली
भारत देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यातच उपचारादरम्यान वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २००४ ते २०१४ पर्यंत १० वर्षे ते भारताचे पंतप्रधान होते. याचवर्षी एप्रिल महिन्यात राज्यसभेतून निवृत्त झाले होते. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.