सातुळी सातेरी मंदिरात उद्या हरिनाम सप्ताह
ओटवणे
सातुळी गावचे ग्रामदैवत श्री. देवी सातेरी मंदिरात गुरुवार २६ डिसेंबर रोजी हरिनाम सप्ताह होणार आहे. सात प्रहराच्या या हरिनाम सप्ताहाची सांगता दुसऱ्या दिवशी शुक्रवार २७ डिसेंबरला होणार आहे. नवसाला पावणारी व माहेरवाशिणीची पाठीराखी अशी सातेरा देवीची ख्याती असल्याने या हरिनाम सप्ताहासाठी भाविकांची गर्दी होते. यानिमित्त सातुळी परिसरातील भजनी मंडळे आपले सेवा सातेरी चरणी अर्पण करतात.