मसुरे :
मंत्री नितेश राणे यांची महाराष्ट्र राज्याच्या मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल समाजसेवक तथा मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी अभिनंदन केले आहे. नितेश राणे यांच्या मंत्रिपदामुळे लोकांचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी चालना मिळणार असल्याचे यावेळी श्रीकांत सावंत यांनी सांगितले.
या वेळी बोलताना श्रीकांत सावंत म्हणतात की, पर्यटनाच्या दृष्टीने आता कोकणातील सर्व बंदरांचा अलिबाग जवळील मांडवा बंदराप्रमाणे मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास होणारच हे निश्चित आहे. मंत्री नितेश राणे यांचे व्हिजन नेहमीच सकारात्मक प्रगतीचे राहीले असून त्यांचे हे मंत्रीपद म्हणजे त्यांच्या अथक कार्यक्षमतेची पोचपावती आहे. नितेश राणे हे कुठल्याही पदावर किंवा मंत्रीपदावर समाधान मानून शांत बसणारे व्यक्तिमत्व नसून ते स्वतःला व कोकणातील जनतेला उत्तरोत्तर विकासाचे आयाम गाठत नेतील अशा सदिच्छा मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत श्रीकांत सावंत यांनी दिल्या असून मंत्री नितेश राणे यांच्या मंत्रीपदाच्या रुपाने कोकणच्या जनतेचा खूप मोठा सन्मान झाल्याचेही मत व्यक्त केले आहे.
यापुढेही कोकणच्या लघु उद्योगांना तसेच पर्यटनाच्या माध्यमातून येथील विकास होण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्यात येणार असून कोकणच्या सर्वांगीण विकासाचा बायोडाटा मुख्यमंत्री महोदयांना मानवता विकास परिषद च्या वतीने सादर करण्यात येणार असल्याची माहितीही श्रीकांत सावंत यांनी यावेळी बोलताना दिली.