जिल्हास्तरीय मुला मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धा जोशपूर्ण वातावरणात संपन
सावंतवाडी
मंगळवार दिनांक 24. डिसेंबर 2024 रोजी स्नेह पत संस्था,रोटरी क्लब सावंतवाडी व मॉर्निंग बॅडमिंटन क्लब सावंतवाडी यांच्या सहयोगाने घेण्यात आलेल्या शालेय गटातील 12 वर्ष खालील व 17 वर्षा खालील मुला, मुलींच्या स्पर्धा मोठ्या जोशपूर्ण वातावरणात संपन झाल्या. या वेळी स्पर्धक व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व सामने अत्यंत अटीतटीचे प्रेक्षणीय झाले, या सामन्यासाठी केतन आजगावकर व नंदकुमार प्रभुदेसाई यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेच्या वेळी दोन छोटया मुलांचा प्रेक्षणीय सामना घेण्यात आला, देवाश कोळी 5 वर्षे व नीरजा पवार 6 वर्षे यांच्या मध्ये सामना झाला. नीरजा विजयी झाली.
दोन्ही छोटया स्पर्धकांना बक्षिसे प्रत्येकी रु. 1000.00 देऊन गौरवण्यात आले.या मुलांना उत्तेजन देण्यासाठी डॉ. कश्यप देशपांडे व् डॉ. दळवी यांनी सहाय्य केले.
रिझल्ट खालील प्रमाणे-
मुले 12 वर्षाखालील –
आदित्य पिळगावकर
15 -13, 10 -15, 15 -12
प्रनिल नाडकर्णी
मुली 12 वर्षाखालील –
स्वरा कोळी
15 -12, 15 -9
स्वरा म्हाडगूत
मुले 15 वर्षाखालील
कु. साईराज सामंत
21 -19, 21- 19
कु. यश दोंडमनी
मुली 17 वर्षाखालील
कु.शरयू चूबे
21 -13, 22- 24, 21 -18
कु.गौरी खवळेकर
प्रदर्शनीय सामना
वय वर्ष 5 – कु. देवांग कोळी – रु 1000/-
वय वर्ष 6- कु. नीरजा पवार रु. 1000
डॉ.कश्यप देशपांडे व डॉ. दळवी यांच्या सहकार्याने देण्यात आले.