You are currently viewing कृतज्ञता

कृतज्ञता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कृतज्ञता*

 

पूज्य साने गुरुजी

कृतज्ञता पुरेपूर

संस्कारांच्या गोष्टी कथा

द्वेष मत्सर राहे दूर…

 

थोर शिक्षक जाहले

मनाने माऊली सात्विक

आई श्यामची लिहून

दिले संस्कार पुस्तक।।

 

संवेदनशील मन

कथेमधे घडविले

वय अजाण कोवळे

संस्कारांनी मढविले।।

 

आई श्यामची सहज

सांगे रितीत जगणे

उपदेश गोष्टीतून

साध्या साध्या प्रसंगाने।।

 

उपकार गुरूजींचे

घडविली पिढी छान

अमृत झाले आयुष्य

वाचुनिया बोध पान।।

~~~~~~~~~~~~~

*अरुणा दुद्दलवार@✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा