मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन २७ डिसेंबर रोजी
सावंतवाडी
मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव प्रशालेचा ६४ वा वार्षिक “पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन” शुक्रवार २७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे संचालक सीताराम नाईक, तर प्रमुख अतिथी डॉ. स्नेहल गोवेकर (होमिओपॅथीक डॉक्टर, सावंतवाडी) असून मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे खजिनदार मोहन मुळीक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर राऊळ, शाळेचे माजी विद्यार्थी प्रदीप राणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण तर सायंकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शक कार्यक्रम होणार आहेत, या सर्व कार्यक्रमास पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करावा व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आस्वाद घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मुख्याध्यापक एम. बी. फाले, सांस्कृतिक विभाग प्रमुख बाबाजी सावंत, शालेय सांस्कृतिक मंत्री नारायण मांजरेकर, शालेय मुख्यमंत्री निधी राऊळ यांनी केले आहे.