मडुरा श्री रवळनाथाचा उद्या जत्रोत्सव
बांदा
मडूरा येथील श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार २५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी श्रींची विधीवत पूजाअर्चा, अभिषेक होईल. त्यानंतर देवाला केळी ठेवणे, नवस बोलणे व फेडणे हे कार्यक्रम होतील. रात्री देवीची तरांगकाठी वाजतगाजत माऊली मंदिरातून श्री रवळनाथ मंदिरात येईल. त्यानंतर रात्री श्रींची सवाद्य पालखी मिरवणूक व मध्यरात्री नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन मडूरा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.