You are currently viewing अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा – सिंधुदुर्ग जिल्हा कॉँग्रेसची मागणी

अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा – सिंधुदुर्ग जिल्हा कॉँग्रेसची मागणी

अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा – सिंधुदुर्ग जिल्हा कॉँग्रेसची मागणी*

*कणकवली

संविधानाला विरोध करणाऱ्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अमित शहांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

अमित शहा हे आजवर संविधानाला विरोधच करत आले आहेत.त्यांच्या पक्षालाही हे संविधान मान्य नाही.त्यांच्या पुर्वजांनी संविधान निर्मितीच्या वेळी संविधान जाळले होते.हिच त्यांची भूमिका अमित शहांनी अधिवेशनात बोलून दाखवली.त्यामुळेच संविधानाला विरोध करणाऱ्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांना या देशातील जनता कदापी थारा देणार नाही.म्हणूनच अमित शहा यांच्याकडून पंतप्रधानांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष ईर्षाद शेख यांनी केली.

कणकवली येथील राष्ट्रीय कॉग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरये, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जिल्हा चिटणीस प्रवीण वरुणकर,तालुका उपाध्यक्ष प्रदीपकुमार जाधव, युवक काँग्रेस अध्यक्ष अनिकेत दहिबांवकर उपस्थित होते.डॉ.बाबासाहेब

प्रतिक्रिया व्यक्त करा