*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य प्रा.सत्यवान घाडी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सेल्फी शेतकरी दिनाचा*
********************
सेल्फी, फोटो घेऊन सहज आम्ही
साजरे करतो शेतकरी दिन
प्रत्यक्षात मात्र ठरवतो आम्ही
आपल्या पोशिंद्या शेतीला हिन।।१।।
गावची वेस ओलांडून आपण
धाव घेतो थेट शहरात निरर्थक
आस ठेवून कधितरी आपल्या
वेड्या जीवनाचे होईल सार्थक।।२।।
आपल्या पणजोबा, आजोबांनी मात्र
नित्य सेल्फी पाहिला नखशिखांत
रुबाबदार, चिखलाने माखलेला
शेतातील चिखलाच्या पाण्यात।।३।।
होता एकेकाळी हाडाचा शेतकरी
काळ्या धरतीला आई मानणारा
दिवसरात्र आईच्या सेवेसाठी
अपार कष्ट सदैव सोसणारा।।४।।
गाय,बैल, कोंबडी,कुत्री, माणसांनी
होता त्याचा सुंदर नटलेला संसार
आज मात्र त्याच्या ह्या सेल्फीमधून
हे सारेच झाले पूर्ण हद्दपार।।५।।
शेतकरी दादा उचल तुझी साधने पुन्हा
वाट पाहते तुझी ओस पडलेली जमीन
हिरव्यागार शिवारी सेल्फी घेऊन
साजरा करण्यास शेतकरी दिन।।६।।
*********************************
*रचनाकार:-* प्रा.सत्यवान शांताराम घाडी.
*गांव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.
*ठाणे:-* दिवा
🌸🌾🌾🌾🌾🦚🌾🌾🌾🌾🌸