You are currently viewing राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर रोजी आयोजन

राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर रोजी आयोजन

राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी

 राष्ट्रीय ग्राहक दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम हा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी साजरा केला जातो. परंतु यावेळी तालुक्याला प्राधान्य मिळण्याच्या अनुषंगाने हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी सावंतवाडी तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने दि. 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लतीफ बेग गार्डन हॉल कोलगांव सावंतवाडी येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा