You are currently viewing दाभोली हळदणकरवाडी रस्त्यावर इलेक्ट्रिक दुचाकी आणि बोलेरो यामध्ये ‌झालेल्या अपघातात युवक जागीच ठार

दाभोली हळदणकरवाडी रस्त्यावर इलेक्ट्रिक दुचाकी आणि बोलेरो यामध्ये ‌झालेल्या अपघातात युवक जागीच ठार

दाभोली हळदणकरवाडी रस्त्यावर इलेक्ट्रिक दुचाकी आणि बोलेरो यामध्ये ‌झालेल्या अपघातात युवक जागीच ठार

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली हळदणकरवाडी भवानी मंदिरच्या समोर रस्त्यावर आज दुपारी १.३० वाजण्याच्या सुमाराला इलेक्ट्रिक दुचाकी आणि बोलेरो या दोन गाड्यांमध्ये समोरासमोर अपघात झाला. या अपघातात सुंदरभाटले येथे भाड्याने राहणारा दिनेश विजय भोगले वय ३४ याचा मृत्यू झाला.

वेंगुर्ले दाभोली मार्गे कुडाळ रस्त्यावर दाभोली हळदणकरवाडी येथील नारायण मंदिरजवळील वळणावर शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बोलेरो पिकअप त (MH-07-0323) व इलेक्ट्रिक दुचाकी (MH07-4377) यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा युवक वेंगुर्ले सुंदरभाटले येघे भाड्याने राहत होता.

या अपघातातील बोलेरो पिकअप हा टेम्पो दाभोलीच्या दिशेने येत होता तर इलेक्ट्रीक दुचाकी वेतोरेच्या दिशेने जात होती. दुपारी वळणावरील उतारावर हा अपघात झाला. या अपघाताचे वृत्त समजताच हळदणकरवाडी येथील नागरिक तात्काळ घटनास्थळी जमा झाले. पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर, सरपंच उदय गोवेकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण बांदवलकर, पंचायत समितीचे माजी सदस्य समाधान बांदवलकर, दादा गोवेकर, वायंगणी उपसरपंच रवींद्र धोंड, दिलीप बांदवलकर, मनोज कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोशी, उमेश जोशी, प्रकाश बांदवलकर, गणेश हळदणकर, सिद्धेश प्रभू, माजी सरपंच मनाली हळदणकर, दाभोली ग्रामपंचायत सदस्य जया पवार आदी ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनची संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश कुबल, हवालदार भगवान चव्हाण, बंटी पालकर आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. 102 ॲम्बुलन्सने युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी युवकाच्या नातेवाईकांना सदर घटनेची खबर दिली असून अधिक तपास सुरू आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा