You are currently viewing प्रण करुया नवा नवा

प्रण करुया नवा नवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा प्रा.सत्यवान घाडी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रण करुया नवा नवा*

******************

 

वर्षारंभी माझ्या बांधवा

प्रण करुया नवा नवा ।।धृ।।

 

आळस सारा झटकून देऊ

स्वकष्टाचे बाळकडू घेऊ

दुजा उपकार नसे बरवा

प्रण करुया नवा नवा।।१।।

 

उद्योगाची कास धरुया

तरूण शक्तीस काम देवुया

क्षमवू सारा पोटाचा वणवा

प्रण करुया नवा नवा।।२।।

 

व्यसनापासून राहुया दूर

सुखानंदाचा वाहुया पूर

नवशक्तिचा घुमेल पारवा

प्रण करुया नवा नवा।।३।।

 

न्यायाने करुया व्यवहार सारा

भ्रष्टाचाराला नको इथे थारा

नि:स्वार्थ शिक्षण देऊ मानवा

प्रण करुया नवा नवा।।४।।

 

जागोजागी लावुया वृक्ष

वाचविण्या जंगल राहू दक्ष

जाऊ तिथे मिळेल गारवा

प्रण करुया नवा नवा।।५।।

 

*************************************

 

*रचना:-* प्रा.सत्यवान शांताराम घाडी.

*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.

*ठाणे:-* दिवा.

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

🌺 *हे नूतन वर्ष तुम्हां सर्वांना सुख, समृद्धी आणि आरोग्यपूर्ण जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!*🙏🏻🌺

🏵️ *नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!*🏵️

 

🌳🌸🌴🌸🌲🌺🦚🌺🎄🌸🌳

प्रतिक्रिया व्यक्त करा