You are currently viewing उद्योजक विवेकानंद नाईक यांनी राममंदिर उभारणीसाठी केली 1 लाख 11 हजारांची मदत

उद्योजक विवेकानंद नाईक यांनी राममंदिर उभारणीसाठी केली 1 लाख 11 हजारांची मदत

दोडामार्ग:

दोडामार्ग तालुक्यातून राम मंदिर निधी समर्पण अभियानासाठी भव्य सुरूवात झाली असून राम मंदिर उभारणीसाठी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक यांनी १११००० ( एक लाख अकरा हजार) रूपयांचा धनादेश समिती कडे सुपूर्द केला आहे.
यावेळी श्रीमती सुशिलाबाई मेमोरियल ट्रस्टचे संचालक व उद्योजक विवेकानंद नाईक यांचे सुपुत्र डॉ. विराज नाईक, सौभाग्यवती सौ. वर्षा नाईक यांसह राम मंदिर न्यास समितीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दोडामार्ग तालुका निधी संकलन समितीने नाईक यांच्या निवासस्थानी भेट दिली असता नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विवेकानंद नाईक व कुटुंबियांनी पुन्हा एकदा दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे. अलीकडेच नाईक यांनी आपल्या ट्रस्ट तर्फे दोडामार्ग शहरवासीयांसाठी मोफत शवावाहिका लोकार्पण केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा