You are currently viewing भेडशी हायस्कूलच्या भूमी सावंतची शालेय राज्यस्तरीय साॅफ्ट बाॅल संघात निवड…

भेडशी हायस्कूलच्या भूमी सावंतची शालेय राज्यस्तरीय साॅफ्ट बाॅल संघात निवड…

भेडशी हायस्कूलच्या भूमी सावंतची शालेय राज्यस्तरीय साॅफ्ट बाॅल संघात निवड…

दोडामार्ग

राज्यस्तरीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धा व निवड चाचणीत न्यू इंग्लिश स्कूल व भेडशी हायस्कूलची विद्यार्थीनी व पिकुळे-शेळपीवाडीतील भूमी हनुमंत सावंत हिची महाराष्ट्र राज्य शालेय साॅफ्टबाॅल संघात निवड झाली आहे. ही राष्ट्रीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धा जळगांव येथे संपन्न होणार आहेत.
या निवडीबद्दल बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संस्था अध्यक्षा कल्पना तोरसकर, कार्याध्यक्ष डाॅ.मिलिंद तोरसकर , सचिव संतोष सावंत, खजिनदार वैभव नाईक, समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर, सहसचिव तथा प्राचार्य नंदकुमार नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडाअधिकारी विद्या शिरस व जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून तिचे अभिनंदन करण्यात आले

प्रतिक्रिया व्यक्त करा