You are currently viewing कौटुंबिक तक्रारी संख्येत वाढ : जिल्ह्यात लवकरच महिलांचे शासकीय वसतिगृह – रूपाली चाकणकर

कौटुंबिक तक्रारी संख्येत वाढ : जिल्ह्यात लवकरच महिलांचे शासकीय वसतिगृह – रूपाली चाकणकर

कौटुंबिक तक्रारी संख्येत वाढ : जिल्ह्यात लवकरच महिलांचे शासकीय वसतिगृह – रूपाली चाकणकर

सिधुदुर्गनगरी

राज्य महिला आयोगाच्या महिला आयोग आपल्या दारी उपक्रमात तब्बल १२० तक्रार अर्ज दाखल झाले. यातील बहुसंख्य तक्रार अर्ज लागलीच निकाली काढण्यात आले. यात कौटुंबिक वादाच्या तक्रारींची संख्या जास्त होती. त्यामुळे घरातून बाहेर काढलेल्या आणि घटस्फोटित महिलांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात जिल्ह्यात लवकरच महिलांचे शासकीय वसतिगृह सुरू केले जाणार असल्याची माहिती या आयोगाच्या आढावा बैठकीत नंतर पत्रकारांशी बोलताना आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिला आरोग्य आपल्या दारी उपक्रम व आढावा बैठक संपन्न झाल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ आदी उपस्थित होते. आजच्या या उप्रकामात जिल्हाभरातून १२० महिलांनी तक्रार अर्ज दाखल केले होते. यात वैवाहिक, कौटुंबिक ३८, सामाजिक ९, मालमत्ता – आर्थिक समस्या १०, कार्यालयाच्या ठिकाणी छळ २ आणि इतर ६१ तक्रारींचा समावेश आहे. यातील बहुसंख्य तक्रार अर्ज लागलीच निकाली काढण्यात आले. यात कौटुंबिक वादाच्या तक्रारींची संख्या जास्त होती. त्यामुळे घरातून बाहेर काढलेल्या महिला आणि घटस्फोटित महिला अशा महिलांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात जिल्ह्यात लवकरच महिलांचे शासकीय वसतिगृह सुरू केले जाणार असल्याची माहिती या आयोगाच्या आढावा बैठकीत नंतर पत्रकारांशी बोलताना आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भ्रूणहत्या होत नाही मात्र असे असले तरी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटर ची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. तसेच संबधित ग्रामपंचायत प्रशासनाने आपल्या गावातील गरोदर महिलांची सखोल माहिती ठेवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या आहेत

११२ व १०९१ हेल्पलाईन नंबर
११२ शहरी भागासाठी तर १०९१ हा ग्रामीण भागासाठी महिलांसाठी हेल्पलाईन नंबर आहे. यावर कॉल करून महिलांनी पोलिसांकडून आपल्याला आवश्यक वेळी मदत मागू शकतात त्यामुळे महिलांना जास्तीत जास्त या नंबर बाबत माहिती होईल यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले

प्रतिक्रिया व्यक्त करा