*जागतिक साकव्यचे अध्यक्ष श्री पांडुरंग वसंत कुलकर्णी, डॉ.प्रा.जी.आर उर्फ प्रवीण जोशी, प्रा.राज शेळके यांचा समावेश*
गोवा :
जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. अध्यक्ष श्री पांडुरंग वसंत कुलकर्णी, डॉ.प्रा.जी.आर उर्फ प्रवीण जोशी, प्रा.राज शेळके यांना को.म.प. गोवाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार संमेलना अध्यक्ष डॉ.प्रा. तुकाराम रोंगटे (मराठी विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे), उद्घाटक डॉ.प्रा.स्नेहा सुहास प्रभू महांबरे (मराठी विभाग प्रमुख सरकारी महाविद्यालय साखळी गोवा), तसेच स्वागताध्यक्ष सौ.अमिता अवधूत नायक सलत्री (उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार विजेती) यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी को.म.प. गोव्याचे अध्यक्ष सुदेश आर्लेकर, बोडदेश्वर संस्थांचे अध्यक्ष श्री आनंद भाई, नगराध्यक्षा म्हापसा सौ.डॉ.नूतन बिचोलकर, नगरसेवक सुधीर कांदोळकर, तारक आरोलकर, माजी नगरसेवक गुरुदास वायंगणकर त्याचप्रमाणे कोमप गोव्याचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित राहणार आहेत.
कोकण मराठी परिषद, गोवा गेली २० वर्षे सातत्याने शेकोटी साहित्य संमेलन घेत असून यावर्षीचे २० वे साहित्य संमेलन २१ व २२ डिसेंबर २०२४ रोजी म्हापसा गोवा येथे पार पडणार आहे. हे साहित्य संमेलन शनिवार दि.२१ डिसेंबर रोजी बोडदेश्वर मंदिर समोर दीपस्तंभ जवळ सायंकाळी ५ ते ८ व रविवार दि. २२ डिसेंबर रोजी लक्ष्मीनारायण सभागृहात सकाळी ८ ते ४ या वेळेत पार पडणार आहे. जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय अध्यक्ष, कवी, गझलकार, वारकरी, उद्योगपती श्री.पांडुरंग वसंत कुलकर्णी, नाशिक यांच्यासह डॉ. प्रा. जी.आर.उर्फ प्रविण जोशी, प्रा.गझलकार राज शेळके यांना साहित्य व संस्कृती क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी “को.म.प. गोवा जीवनगौरव” पुरस्कार जाहीर झाला असून २० व्या शेकोटी संमेलनात त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे कोमप गोवा यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे. या सत्काराचे स्वरूप सन्मानपत्र, शाल श्रीफळ व ग्रंथ भेट असणार आहे.
गोवा राज्यात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात कोमप गोवा गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. गोवा राज्यात मराठी भाषेचा मानसन्मान टिकवण्यात कोमप गोवा संस्थेचे महत्त्वाचे योगदान आहे.